मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
माहेरची आठवण

माहेरची आठवण

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


चंद्राच्या गालावरी

देव लावी गालबोट;

मिरवितें आई,

माझ्या गालीं तुझे ओठ. १

जडली हिरकणी

सोन्याच्या ग कोंदणी;

मोला झाली दुणी

आई, तुझी ग करणी ! २

सासू सासर्‍याचं

घर दिरा-नणंदांच;

पृथ्वीच्या मोलाच गं

लेणं दिलं भ्रताराचं. ३

मायेची माझ्या माय,

जोडिली तूं ग जोडी;

सुरीं सूर लावूं,

लाविली तूं ग गोडी. ४

सूर-सूरीं, झालं

संसाराचं गोड गीत;

मायेची माझ्या माय,

तुवां लाविली ग रीत. ५

फळा आली भाळीं

तीट मायेच्या हाताची

भरलं घर माय,

किलबिल पांखरांची. ६

भरलं घर माय,

अंगण झालं थोड;

दुडुदुडू धावे

लेकराचं खेळघोडं ७

राज्यगादीवरी

काढीं तुझ्या आठवणी;

फळां आली माय,

मायेची आठवणी. ८

उचकी लागे माय,

कांही केल्यानं राहीना;

काढीशी आठवणी ?

सुखी माय, तुझी मैना. ९

N/A

कवी - भा. रा. तांबे

ओवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २५ फेब्रुवारी १९३५

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP