मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
वसंत फेरीवाला

वसंत फेरीवाला

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


आला हाऽऽ दारिं उभा,ऽऽ वसंत फेरीवाला ! ध्रु०

पोतें खांद्यावरि सौद्याचें देइल ज्याचें त्याला. १

कुणीं लाविला गुलाब-बेला, घर न पुरे वासाला. २

कुणीं पेरिले अंगणिं कांटे वाव न पद देण्याला. ३

कुणीं पेरिले पेरू-आंबे, वाण न माधुर्याला. ४

कुणीं लाविल्या बोरीबाभळि, हाणिति कर कर्माला. ५

चोख दयाळू फेरीवाला, त्याला दोष कशाला ? ६

लावुनि पालवि खुलवुनि फुलवुनि देइ परत कांट्याला ७

दाम तसा घ्या माल मोजुनी, बोल इथे कोणाला ? ८

N/A

कवी - भा. रा. तांबे

जाति - लवंगलता

राग - देस

ठिकाण - अजमेर

दिनांक - ५ नोव्हेंबर १९२२

Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP