मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|भा. रा. तांबे|संग्रह ३|
पहा हो कसा हा कारागीर !

पहा हो कसा हा कारागीर !

भा.रा.तांबे यांच्या कविता अत्यंत हळुवार असून त्या मनाला भिडतात


पहा हो कसा हा कारागीर !

थरारुनी तनू झरे नयनीं नीर. ध्रु०

कतरण ही पानिंपानिं रम्य झालरीपरी

तरी करांतरीं कुठे नाहिं कातरी ! १

फुलाफुलामधें कशा छटा सुरम्य रंगल्या !

इंद्रचाप रंग हे ! करिं न कुंचल्या. २

मख्माली फुलपांखरुं सुबक हें पहा कुणी,

बुट्या पहा परांवरी, करिं न लेखनी. ३

अगाध नीलिमा वरी, रम्य गोल त्यावरी

सुनेरी रुपेरी हे खीलहि न करीं. ४

काळी ही चंद्रकळा रात्र ल्यालि; तीवरी

कशीदा रुपेरी हा, सुइ कुठे करीं ? ५

गझनीचा पट भरजरि भानुच्या गवाक्षिं तो,

अधांतरीं अयंत्रची किति चकाकतो ! ६

लवव मान मानवा, वृथाभिमान सांडुनी;

अनंत रम्यता पहा ! लाज रे मनीं. ७

N/A

कवी - भा. रा. तांबे

राग - भ्रैरवी

ठिकाण - लष्कर-ग्वाल्हेर

दिनांक - २० जानेवारी १९२७


Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP