व्यर्थ जन्म आमुचा ॥ प्रभू हो ॥ व्यर्थ जन्म आमुचा ॥धृ० ॥
नाही स्वार्थ ना परमार्थ । लेशही नाही सौख्याचा ॥ प्रभू हो ॥ व्यर्थ० ॥१॥
जन्मा येवुनी कांही न केलें । होतो खेद अंतरीं याचा ॥प्रभू हो॥ व्यर्थ० ॥२॥
मुक्त करुनी ह्या संसारीं । तोडी बंधन जीविचा ॥ प्रभू हो व्यर्थ० ॥३॥
वय हें सारें व्यर्थची जाई । म्हणुनी करीते धावा तुमचा ॥प्रभू हो ॥ व्यर्थ० ॥४॥
कामक्रोधापासुनी सोडवी । लवही नको वारा ह्यांचा ॥ प्रभू हो ॥व्यर्थ० ॥५॥
नामस्मरणीं वृत्ती जडो ही । हेतू हा अंतरींचा ॥प्रभू हो ॥ व्यर्थ० ॥६॥
तुजविण देवा कांही गमेना । आश्रय दे तव चरणाचा ॥ प्रभू हो ॥व्यर्थ० ॥७॥
हात जोडुनी हीच विनंती । राही हृदयीं वारीच्या ॥ प्रभू हो ॥व्यर्थ० ॥८॥