मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
घ्याहो हरीचें नाम ॥ अखंडच...

भक्ति गीत कल्पतरू - घ्याहो हरीचें नाम ॥ अखंडच...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


घ्याहो हरीचें नाम ॥ अखंडची ॥ घ्याहो हरीचें नाम ॥धृ०॥

आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । करीता सर्वही काम ॥

अखंडची॥ घ्यावो हरीचें नाम ॥१॥

निशिदिनीं हरीचें ध्यान करुनी । सुंदर पाहावा शाम ॥

अखंडची॥ घ्यावो ० ॥२॥

भावभक्तिने भजतां प्रेमाने । होय जीवा आराम ॥

अखंडची॥ घ्यावो ० ॥३॥

वारी म्हणे हो निजभक्ताला । देई शांतीचें धाम

अखंडची॥ घ्यावो ० ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP