मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
माझा तो प्राणसखा । श्रीहर...

भक्ति गीत कल्पतरू - माझा तो प्राणसखा । श्रीहर...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


माझा तो प्राणसखा । श्रीहरीच बाई ॥धृ०॥

ज्याच्या मुळे सर्व सुख । प्राप्त मला होई ।

त्यावांचुनी क्षणही एक । गमत मला नाही ।

माझा तो प्राणसखा० ॥१॥

तोच असे माझें जीवन । तोच रक्षी माझा प्राण ।

म्हणुनी त्यासी मी अनन्य । शरण सदा पायीं ।

माझा तो प्राणसखा० ॥२॥

त्यास धरुनी नित्य हृदयीं । ध्यान धरुनी नित्य पाही ।

समरस होवुनी जाई । वारी दुजी नाही ।माझा० ॥३॥


References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP