माझा प्राणसखा हो प्राणसखा । श्रीकृष्ण पाठीराखा ॥धृ०॥
त्रिविध तापें मज बहु गांजीलें । झडकरी मुक्त करी तूं बाप्पा ।
माझा प्राणसखा हो प्राणसखा ॥१॥
अध्यात्म तापें ह्या देहीं पिडीलें । येवुती पाजी प्रेमामृता । माझा० ॥२॥
मी मतीमंद हीन दीन असें । चरणीं तव ठेवितें माथा । माझा० ॥३॥
पतीत पावन असंख्य करुनी । मोक्षपद त्या देसी हाता । माझा० ॥४॥
गजेंद्र पशूने धावा करिता । झालासी त्या पाठीराखा ॥माझा० ॥५॥
शरणांगताते रक्षिसी ब्रीद हें । गणसी न त्याचे पापा । माझा० ॥६॥
ऐसा तूं दीनदयाळ हरी बा । हरीसी तूं वारीच्या भवभय व्यथा । माझा० ॥७॥