दयाघना हो दयाघना । येवुं द्या दिनाची करुणा ॥धृ०॥
धाव धाव घाल बा उडी । या विषयापासुनी मजला काढी ।
विलंब लावेन अर्ध्ये घडी । वीट आला या मना । दयाघना हो दयाघना० ॥१॥
पूर्ण शांती मना देई । जेणें स्थीर मन हें होई ।
दुजें मागणें नसे हो कांही । पुरवी हो कामना । दयाघना हो दयाघना० ॥२॥
हे दयाघन करुणाकरा । दीन हें बालक अंगीकारा ।
भवभयाते दूर करा । चातक वारीवरी ओळिंघना । दयाघना हो दयाघना० ॥३॥