देवा कधी तूं मजसी । सख्या सांग रे बोलसी ॥धृ०॥
कां धरीलें रे तूं मौन । ही भक्ति नसे कां तुज मान्य ।
मग काय करुं रे मी अन्य । तें सांग तूं येवुनी मजसी । देवा कधी० ॥१॥
भक्तींत ह्या चुकतें काय । तें दावुनी सांगी सोय ।
धरीतें तुझे मी पाय । सुचेना कांही मजसी । देवा कधी० ॥२॥
आज का बोलसी उद्या । हें सांग तरी मज सध्या ।
तुम्ही कांही मलाहो न द्या । परी एक वेळ बोला मजसी ।देवा कधी० ॥३॥
तुझें हास्यवदन पाहून । मन होय माझें तल्लीन ।
वाटें तुज आलींगुन । बोलावें तूं वारीसी । देवा कधी० ॥४॥