श्रीहरी पदीं राहाणार । सदा मी चरणांमृत पीणार ॥धृ०॥
चरणांमृताची गोडी अती ती । पीता काया अमरची हो ती ।
मस्तकीं तें धरणार । सदा मी०॥१॥
चरणाची गंगा करी पाप भंगा । पावन करीत असे ती जगा ।
तीथे वस्ती करणार । सदा मी०॥२॥
चरणकमल ते हृदयी ठेवुनी । जाईन त्यांतची मी रंगुनी ।
वारी म्हणे मुरणार । त्यांतची वारी म्हणे मुरणार ॥सदा मी०॥३॥