सद्गुरुराया प्रेमें दोन्ही डोळा । पाहीन कधी तो निजसुख सोहळा ॥धृ०॥
समुद्रीं लाटा खेळती जैशा । स्वानंद सुखांत लोळवी तैश्या । सद्गुरुराया० ॥१॥
आकाशीं वायूची उठे जैसी झुळुक । स्वरुपीं तैशा होवुनी एक । सद्गुरुराया० ॥२॥
पाण्याची गार पाण्यांत विरे । चित्त चैतन्यीं तैसें हें विरें । सद्गुरुराया० ॥३॥
द्वैता द्वैताची नुरे ती वार्ता । वारी म्हणे निजसुख सोहळा पाहतां. ।
सुख सोहाळा पाहतां। सद्गुरुराया० ॥४॥