ये धावत सदगुरुराया हो । ये धावत सद्गुरुराया ॥धृ०॥
तुझा आमुचा बहु जन्माचा । संबंध जडलासे पाया हो । ये धावत० ॥१॥
सोडीना तव पद पंकज हें । मृत झाली जरी काया हो । ये धावत० ॥२॥
आड असा कां ठाकुनी राहसी । मध्ये घालुनी माया हो । ये धावत० ॥३॥
मायापटल हें दूर करुनी । निजरुप दावी सदया हो । ये धावत० ॥४॥
निजानंदीं तल्लीन वारी । अर्पुनी तवपदीं काया हो । ये धांवत० ॥५॥