सद्गुरुनाथा चरणीं माथा ठेवुनी प्रार्थीतें. ।
दीन जनाची माय असे हो भक्ति द्या माते ॥धृ०॥
तव भक्तीचा अगाध महिमा जगतीं ह्या थोर. ।
संत सज्जन ब्रम्हादीकते वंदिती सुरवर ।
वेद श्रुती त्या कुंठीत झाल्या न कळे त्या पार. ॥
मंदमती मी काय वर्णूं तत्पदीं लीन होतें ।सद्गुरुनाथा० ॥१॥
नामाची तव श्रीगुरुराया काय वर्णू थोरी ।
गुरु गुरु गुरु गुरु अखंड वदतां काळ होय दुरी ।
नाम नौका भवसागरीं ह्या तारी झडकरी. ।
अखंड नाम वदनीं येवो म्हणुनी मी स्तवितें ।सद्गुरुनाथा० ॥२॥
ध्यान महिमा ऋषी मुनी आगमा निगमाही न कळे. ।
ध्येय ध्यातां समरस होवुनी देहबुद्धी गळे ।
दृष्या दृष्य सोडुनी मन हें स्वस्वरुपीं मिळे.
ऐसी कृपा वारी म्हणे हो करी आम्हावरते । सद्गुरुनाथा० ॥३॥