कैवारी भगवान । आमुचा ॥ कैवारी भगवान ॥धृ०॥
संकट समयीं धावुनी येतो । घेतां त्याचें हो नाम ॥
आमुचा ॥ कैवारी भगवान ॥१॥
भक्त संकटीं स्मरतां हृदयीं । धांवे विसरुनी भान ॥ आमुचा ॥२॥
भक्तासाठी गडबडतो बहु । विसरुनी मानापमान ॥आमुचा० ॥३॥
दीन दयाळु नित्य स्मरतां । काय सुखाला वाण ॥आमुचा० ॥४॥
वारी म्हणे प्रभूपदीं रत होवुनी । करा अमृत पान ॥आमुचा ॥५॥