हें काय कृष्णा गोविंदा । टाकुनी आम्हां कां जाशी मुकुंदा ॥धृ०॥
घडी घडी गुप्त तूं होसी । तव विरहाने झालें मी पिशी ।
भेट आता कधी देशी । लावुनी आम्हां तव प्रेमछंदा ।
हें काय कृष्णा गोविंदा ॥१॥
दीन आम्ही रे अबला । मोहीत झालों स्वानंदाला ।
सोडीलें संसाराला । रत झालों हरी तव पदारविंदा । हें काय० ॥२॥
अससी तूं आमुचा रे प्राण । तुजविण राहावेना एकही क्षण ।
वाटे युगासमान म्हणुनी वारी लीन पदीं सदा । हें काय० ॥३॥