सच्चिदानंद सद्गुरुराया । शरण मी पायीं आलें हो ।
कृपा करुनी मज दीनाला । पदरीं सत्वर घ्यावे हो ॥धृ०॥
कैसी भक्ति कैसी वृत्ती । न कळे मजला युक्ति हो ।
प्रेम श्रद्धा नाही पुरती । कैसी मग ती मुक्ति हो ।
सच्चिदानंद सद्गुरुराया० ॥१॥
आचार न कळे मग विचार कैसा । मंद बुद्धीसी आकळे हो ।
परी तव कृपादृष्टी होतां । सहजची प्राप्ती होईल हो ।
सच्चिदानंद सद्गुरुराया० ॥२॥
चतुष्टाय जरी साधन साधीलें । तव कृपेंविरहीत फोलचीं झालें ।
म्हणुनी वारीने पद दृढ धरिलें । सत्य हें निश्चये जाणुनी हो ।
सच्चिदानंद सद्गुरुराया० ॥३॥