कसा गे बाई भेटेल तो घनश्याम । भेटेल तो घनश्याम ।
कसा गे बाई भेटेल तो घनश्याम ॥धृ०॥
वनोवनीं हिंडुनी शिणलें बहु मी ।
दिसत नाही तो शाम । कसा ग बाई० ॥१॥
घाबरतो बहु जीव माझा हा । छळीतो मसी हा काम । कसा गे बाई० ॥२॥
शोधूं कुठे तरी ह्या श्रीहरीला । सांपडेना तो धाम । कसा गे बाई० ॥३॥
वारी म्हणे घर बसल्या येईल । घेतां अखंड नाम । कसा गे बाई० ॥४॥