तुझी कृपा ईश सतत राहूं दे आम्हांवरी ।
हो राहूं दे आम्हांवरी । दूर करुनी त्रिविध ताप घेई पदरीं ।
देवा घेई पदरीं ॥धृ०॥
दीन अज्ञ लेकरुं तुझें । नाही ज्ञान स्वरुपाचें ।
देवुनी मती वदवी वाचें । लीला तव हरी ।
हो लीला तव हरी । तुझी कृपा ईश सतत राहुं दे आम्हांवरी ॥१॥
देशील मजशी ज्ञान बुद्धी । तरी होतील प्राप्त सर्व सिद्धी ।
माय तूं दयानिधी । करी कृपा दासावरी ।
हो देवा भक्तावरी । तुझी कृपा० ॥२॥
सर्वज्ञ तूं ज्ञानघन । म्हणुनी आलें हो देवा शरण ।
चुकवुनी हें जन्ममरण । मुक्त करी वारी ।
देवा मुक्त करी वारी । तुझी कृपा० ॥३॥