कधी होईल ऐसे श्रीहरी । मज सांग सख्या तूं लौकरी ।
कधी होईल ऐसे श्रीहरी ॥धृ०॥
हृदय सरोजीं सुमन कमल हें । विकसेल कधी बुद्धीं तरी ॥ कधी० ॥१॥
विकार कमलाचा होण्याला । ज्ञानोदय कधी होई तरी । कधी० ॥२॥
सुमन कमल हें पूर्ण विकसीता । कधी वाहीन प्रेमें चरणावरी । कधी० ॥३॥
सुदीन ऐसा स्वानंदाचा । कधी उगवेल वारीचा सांगा हरी । कधी० ॥४॥