दाखवी तें दिव्य रुप सुंदर मनमोहना ॥धृ०॥
शाम तनु मृदु भारी । नवनीता दूर करी ।
कोमलता वर्णूं कितीतरी । वाचे बोलवेना ।दाखवी० ॥१॥
भागवती वर्णीयलें । ऐकुनी मन मोहियलें ।
पाहाण्यास्तव नयन भुकेले । एकदा तें दावाना ।दाखवी० ॥२॥
सच्चिदानंद कंद । तोची तूं सगुण गोविंद ।
पाहातां होय ब्रम्हानंद । वारीच्या मना ।दाखवी० ॥३॥