कमलाकर प्रभू गिरीधर नागर ।
चरण धरत तव दीन मी किंकर ।
कमलाकर प्रभू ॥धृ०॥
हे कमलाधर हे कमलावर । अज्ञान पामर ।
उद्धरी सत्वर । कमलाकर प्रभू० ॥१॥
दुस्तर हा भवसागर फार हो ।
कोण करील मज यांतुनी पार हो । कमलाकर प्रभू० ॥२॥
बावरतो जीव बहु अनीवार हो ।
घरवेना आता वारीसी धीर हो । कमलाकर प्रभू० ॥३॥