यदुराया तुज शरण मी आलें । मिथ्या जग हें जाणुनी हो ॥धृ०॥
जळीं स्थळीं तूं काष्टी पाषाणीं । तुजवांचुनी दिसेना कोणी ।
एकची भाव अंतःकरणीं । दुजा न दिसे मज जगतीं हो । यदुराया तुज० ॥१॥
तूंची जिकडे तिकडे व्यापक । तूंची अवघा भरला एक ।
तुजवांचुनी स्थळही एक । रितें न दिसें मज कोठे हो । यदुराया तुज० ॥२॥
आसनीं शयनीं भोजनीं गमनीं । छंद तुझाची रात्रंदिनीं ।
विषय दिसेना तुजवांचुनी । जागृती अथवा स्वप्नीं हो । यदुराया तुज० ॥३॥
ऐसा एकी एकची भाव । दृढ करुनी दे तव पदीं ठाव ।
नीजस्वरुपीं नेवुनी ठेव । चिन्मय करी एकी वारी हो । यदुराया तुज. ॥४॥