कोणा मी वरणार ॥ तुजविण कोणा मी वरणार ॥धृ०॥
ब्रम्हरुपा सोडुनी माया । जगीं कैसी दिसणार ।
तुजविण कोणा मी वरणार ॥१॥
उत्तम पुरुषा सोडुनी प्रकृती ।
सांग कुठे राहणार । तुजविण० ॥२॥
सागर सोडुनी गंगा मग ती ।
सांग कुठे जाणार । तुजविण० ॥३॥
पुरुषा सोडुनी छाया मग ती ।
दूर कशी असणार । तुजविण० ॥४॥
वारी म्हणे आस्ती भाती आत्मा ।
प्रियच तो होणार । तुजविण० ॥५॥