देवा कोठे तुज पाहूं ॥ रे देवा ॥
कैसे तुला मी ध्यावूं ॥धृ०॥
स्थिरचर व्यापुनी घनदाट तूं भरला ।
पाय कुठे मी ठेवूं ॥ रे देवा ॥
कोठे तुज पाहूं ॥१॥
एक असुनी द्वैत भाव हा । नको मला तूं देवूं ॥
रे देवा ॥ कोठे तुज० ॥२॥
एकी एक होवुनी देवा । अखंड स्वरुपीं राहूं ॥
रे देवा ॥ कोठे तुज० ॥३॥
वारी म्हणें हा भ्रम द्वैताचा । भक्ति करुनी घालवूं ॥
रे देवा॥ कोठे तुज पाहूं ॥४॥