दिनाचे तुम्ही नाथ ॥ प्रभूजी ॥ दिनाचे तुम्ही नाथ ॥धृ०॥
काय असे हें दुष्कृत माझें । करीती देहावर आघात । प्रभूजी ॥ दिनाचे ॥१॥
त्रिविध ताप हे बुडविती मजला । काढा देवुनी हात ॥ प्रभूजी॥ दिनाचे० ॥२॥
तव पद सेवा ह्या भक्तीचा । विघ्ने करीती घात ॥ प्रभूजी॥ दिनाचे ॥३॥
वारुनी दृष्कृत ह्या विघ्नांते । ठेवा स्वानंदांत ॥ प्रभूजी ॥ दिनाचे० ॥४॥
तुजविण देवा या वारीला । कोण असे जगीं तात ॥ प्रभूजी ॥ दिनाचे० ॥५॥