नाही कुठे जाणार ॥हरीरे॥ नाही कुठे जाणार ।
चिद्स्वरुपींच राहाणार ॥हरीरे॥ नाही कुठे जाणार ॥धृ०॥
देहबुद्धीचा त्याग करुनी । अनन्य पदीं होणार ॥
हरीरे॥ नाही कुठे जाणार॥१॥
सच्चिदानंद स्वरुप तुझें जें । त्यांतची लीन होणार ॥
हरीरे ॥नाही० ॥२॥
वारी म्हण तव ज्योतीमाजीं ।
ज्योतरुपीं मिळणार ॥हरीरे ॥नाही० ॥३॥