मन हें स्वरुपीं स्थीर करी । वारंवार प्रार्थीतसे मीं । तुजला श्रीहरी ॥धृ०॥
स्वरुपावांचुनी कांही नको तें । ऐसें वाटें मम चित्ताते ।
विषय पाहुनी दुःखची होतें । देवा अंतरीं । मन हें० ॥१॥
सगुण सुंदर रुप तुझें तें । आनंद देई मम नयनांते ।
सर्वांभूतीं दिसो मजला तें । चराचरीं । मन हें० ॥२॥
ऐसी कृपा होईल केव्हा । ब्रम्हस्ववरुप जग दिसेल जेव्हा ।
पुरेल वारीची कामना तेव्हा । दे प्रेमा अंतरीं । मन हें० ॥३॥