नाही मी जाणार ॥देवा॥ नाही कुठे जाणार ॥धृ०॥
सोडुनी या तव दिव्य पदाते । भटकत कोण फिरणार ॥देवा॥
नाही कुठे जाणार॥१॥
तीर्थक्षेत्र चरणीं तुझ्या ह्या । अखंड मज घडणार ॥देवा॥नाही कुठे० ॥२॥
व्रतें तपांदी दानें सर्वही । सेवेने होणार ॥देवा। नाही कुठे० ॥३॥
निशिदिनीं हरी तव भजनीं रंगुनी । प्रेम सुख घेणार ॥देवा॥नाही कुठे० ॥४॥
प्रेम सुखामध्ये वृत्ति वारीची । मुरुनीया राहणार सदोदित ॥
मुरुनीया राहणार ॥देवा॥नाही कुठे जाणार ॥५॥