होऊं कशी उतराई ॥ नाथा ॥ होऊं कशी उतराई ।
देण्याला मज कांहीच नाही ॥धृ०॥
देहाच्या ह्या पादुका करुनी । घातील्या जरी पायीं ॥नाथा॥ होऊं० ॥१॥
तनमनधन हें अर्पिलें जरी । उपकार फिटणार नाही॥नाथा ॥ होऊं० ॥२॥
जीव जरी हा बळी पायातळीं । दिला तरी अर्थची नाही ॥नाथा॥ होऊं० ॥३॥
वारी म्हणे मी सर्व अर्पुनी । लीन आता पदीं होई ॥नाथा ॥होऊं. ॥४॥