सच्चिदानंद गुरुराया । दाखवी सत्वर तव पाया ॥धृ०॥
पतीत पापी असे म्हणून । न दाखविसी तव चरण ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥१॥
किंवा प्रारब्ध येवुन । रोधिली वाटची ही त्यान ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥२॥
किंवा प्रेमळ मृदुल न वचन । गोड न लागे तुज म्हणुन ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥३॥
किंवा प्रेमळ भक्त पाहुन । तिकडेची गेलासी धावुन ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥४॥
किंवा भक्तवत्सल ब्रीद टाकुन । राहिलासे वैकुंठी जावुन ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥५॥
किंवा श्रमलांत भक्त रक्षुन । म्हणुनी आता काय केलें शयन ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥६॥
किंवा घालीन संकट म्हणुन । न दाखविसी हरी वदन ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥७॥
यांतुनी कोण करीतें विघ्न । सांगा वारीसी येवुन ।
सच्चिदानंद गुरुराया० ॥८॥