मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
नाम तुझें हें गोड ॥ हरीरे...

भक्ति गीत कल्पतरू - नाम तुझें हें गोड ॥ हरीरे...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


नाम तुझें हें गोड ॥ हरीरे ॥ नाम अतिशय गोड ॥धृ०॥

भवसागर हा पार कराया । नामे बांधिली होड ॥हरीरे॥

नाम तुझें हें गोड ॥१॥

योगयाग विधी । येणे नोव्हे सिद्धी ।

नामची पुरविल कोड ॥हरीरे॥नाम तुझें० ॥२॥

नामे सागरीं पाषाण तरले । ह्याहुनी श्रेष्ठ न जोड ॥

हरीरे॥ नाम तुझें० ॥३॥

वारी म्हणे हे स्वरुपीं मिळवी । म्हणुनी नाम न सोड ॥

मनुज्या ॥ नाम तुझें०॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP