कधी भेटसी तूं मनमोहना रे ॥धृ०॥
शोधूं कुठे तुज । पाहूं कुठे तुज ।
विरह सहन होईना रे । कधी भेटसी तूं मनमोहना रे ॥१॥
दावुनी सुंदर । रुप मनोहर ।
कां लपलासी पुन्हा रे । कधी भेटसी० ॥२॥
प्रगट होई तूं । ह्या हृद्भुवनीं ।
शांतवी नयन मनारे । कधी भेटसी० ॥३॥
अनन्य शरण दास तवपदीं । येवु दे वारीची करुणा रे । कधी भेटसी० ॥४॥