पुण्याहवाचनाची कारिका
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
व्यास :- मांगल्य, धर्मकर्म व संग्राम उपस्थित झाल्यास गंधमाल्यादिकांनीं ब्राह्मणांचे पूजन करून त्यांच्याकडून स्वस्तिवाचन करावे. १ संग्रहे - शुभकर्माविषयी होणार्या पुण्याहवाचनामध्यें दोन कलशांची व अशुभकर्मी होणार्या पुण्याहवाचनामध्यें एका कलशाची स्थापना करावी असे यज्ञवेत्ते म्हणतात. २ विष्णुधर्मोत्तरे - सुवर्णाचे, तांव्याचे अथवा मृण्मय असें कलश लक्षणयुक्त असावे. ३ पंचरत्नामध्ये कोणत्याही रत्नाचा अभाव असल्यास सुवर्णाची योजना करावी. ४ ब्रह्मांडपुराण - पंचपल्लव व साली - वड, पिंपळ, पिंपरी, जांबूळ व अंबा ह्या वृक्षांचे पल्लव अथवा साली कलशामध्ये घालणे योग्य आहे. ५ छंदोगपरिशिष्टे सर्वौषधिगण - कोष्ट, जटामांसी, हळद, दारुहळद, मोरवेल, शिलारस, पांढरा चंदन, कचोरा, चाफ़्याची साल व नागरमोथे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP