गर्भपात होण्याची कारणें
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
आघात अपवातादि दोषामुळें किंवा अनुचित आहारामुळे गर्भवती स्त्रीच्या ज्या ज्या भागाला पीडा होते, त्याप्रमाणे गर्भस्थ बालकाच्याही अगदी त्याच त्या भागाला पीडा होऊन गर्भपात होतो. तसेंच कठीण श्रमाची कामें करणें मलमूत्रावरोध करणें, भयंकर पहाड, डोंगर, नदीकिनारी जाणें, भीतिकारक मोठा आवाज ऐकणे, मनास लागणारी वाईट गोष्ट ऐकणे, फ़ार त्रास होणे, क्रोध येणे, चाहाडी, शोक वगैरे कारणांनी गर्भपात होतो. विशेषत: गर्भवतीनें दुसर्या अथव्या तिसर्या महिन्यांत फ़ारच सावध राहून पतिसमागम टाळावा, कारण त्यायोगे आरंभालाच गर्भधारण शक्ति निर्बल होईल. म्हणून पहिल्या तीन महिन्यांत गर्भपाताचे भय फ़ार असते. ४ थ्या अथवा ५ व्या महिन्यापासून मैथुन करूं नये. गर्भवतीच्या अयोग्य आहारा विहारा पासून गर्भस्थ बालकास पुढे रोग होण्याचा संभव असून गर्भपात होण्याचीही भीति आहे तरी गर्भवती स्त्रीनें योग्य सात्विक पवित्र आहार करावा. आचारशुद्ध व प्रसन्न मनयुक्त राहावे. “ कौमार आचरेत् प्राज्ञो धर्मान्भागवतानिह” मूल गर्भात आहे तेव्हांपासूनच त्याला हरिभक्ति, देशभक्ति वगैरे शिकविली पाहिजे; म्हणजे खात्रीनें गर्भावर ईश्वरी परिणाम होईल जन्मत:च भक्तीचें बी मुलामुलींस पेरले जाऊन कुलोद्धारक व जगदुद्धरकच कन्यापुत्र उत्पन्न होतील.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP