वीरभोजनविधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
नारायणबलीच्या पूर्वदिवशी अधिकारसिद्धि होण्याकरिता वीरभोजन करावे. ते वीर अकरा सांगितले आहेत - वीरभद्र, शंभु, गिरीश, अजैकपाद, अहिर्बुध्न्य, पिनाकी, भुवनाधीश्वर, कपाली, स्थाणु, भर्ग, रुद्र, याप्रमाणे हे वीर अकरा. यांच्या भोजनाकरितां अकरा, आठ अथवा चार ब्राह्मण बोलवावे. आचमन प्राणायाम करून देशकालाचा उच्चार करावा “ मम इह० ” असा संकल्प करून त्या ब्राह्मनांची वीरभद्रादि संतुष्ट होण्याकरिता षोडशोपचार पूजा करावी. नंतर नाना पक्वान्ने व अनारसे यांनी युक्त असे अन्न ब्रह्मणास घालून हात जोडून “ शिवोविष्णु० ” या मंत्रानें प्रार्थना करावी. भोजनानंतर तांबूल, वस्त्र, दक्षिणा वगैरेनी ब्राह्मणांस संतुष्ट करून आपल्या आज्ञेप्रमाणे नारायनबलि करतो असे बोलावे. त्या ब्राह्मणांनी कर अशी आज्ञा करावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP