पूर्णाहूती
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
सर्व कर्मांची परिपूर्णता करणारी, कल्याणकर द्रव्य देणारी अशा पूर्णाहुतीचा तुपानें होम करीन, असा संकल्प करून स्रूवेनें तूप घेऊन स्रूचेला तोंडापर्यंत गच्च भरून तीमध्यें स्रुवेचें तोंड वर करावें. पुन: खालीं तोंड करून स्रूवेचें अग्रभागीं पुष्पअक्षता ठेवून डाव्या हातानें स्रुक् आणि स्रुवा ह्यांची मूळें धरून उजव्या हातानें स्रुक् आणि स्रुवा शंखाच्या मुद्रेनें धरून उभें राहून पाय आणि शरीर सारखे ठेवून स्रुवेवर एकसारखी नजर ठेवावी.
प्रसना अंत:करणानें " ॐ समुद्रा " ह्या अकरा ऋचा म्हणत म्हणत यवायेवढी तुपाची सतत धार धरावी. स्रुचेच्या अग्रानें थोडें बाकी राखून हवन करावें व हें हवि आपदेवतेचें आहे माझें नाहीं. असा उद्देश करून टाकावें " ॐ विज्योतिषा० " हा मंत्र म्हणत बाकी उरलेले तूप अग्नींत हें हवि अग्नीचें आहे माझें नाहीं असें बोलून टाकावें. ५० प्यारा ३० पृष्ठ५३ स्थालीपाक तंत्राचे कर्म करावे.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP