माघ, फ़ाल्गुन, वैशाख या महिन्यांत शुक्लपक्षीं गुरुशुक्रइत्यादिकांचा अस्त वर्ज्य करून अन्यवेळीं द्विरागमन प्रशस्त होय. नक्षत्रें :- मृग, तिन्हीं उत्तरा, पुनर्वसु, पुष्य, रोहिणी, अनुराधा, अश्विनी, ज्येष्ठा, हस्त, स्वाती, श्रवण, शततारका, चित्रा, ही नक्षत्रे आणि शुभतिथि, कुंभ, मेष, वृश्चिक या राशींचा सूर्य, शुक्रादिकांचा उदय, गुरु, बुध, चंद्र हे वार प्रवेशास शुभ जाणावे. विवाहापासून सोळा दिवसाचे आंत जर द्विरागमन कर्तव्य असेल तर अकरावे दिवशीं अथवा समदिवशी ( दोन, आठ, दहा इत्यादिक दिवशी ) करावे. त्यास तिथि, नक्षत्र, वार योग इत्यादिक पाहणे नको.