अनुप्रवचनीय होम
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
आचार्यान सायंसंध्या झाल्यानंतर उपनयनाकरिता ज्या अग्नीवर जो होम केला होता त्या अग्नीच्या पश्चिमेस आपल्या दक्षिणेस ब्रह्मचार्यासह बसून आचमन करून प्राणायाम करावा. देश आणि काल ह्यांचें संकीर्तन करून उपनयनाच अंगभूत असा हा अनुप्रवचनीय होम करीन असा संकल्प करून, स्थालीपाक पृष्ठ ३६ प्यारा ५ पासून “ आज्येन ” येथपर्यंत करून, प्रधान देवतेचा उच्चार करावा तो - सदसस्पति, सविता आणि ऋषि यांना चरुद्रव्यानें, असा उच्चार करून स्थालीपाक पृष्ठ ३७ प्यारा ७ “ शेषेण० ” येथून पृष्ठ ४७ प्यारा २५ “ विधूमज्वालाग्नौ ” येथपर्यंत करावा. त्यांत विशेष पूर्णपात्र नेण्यापर्यंतचा सर्व प्रकार करून, भिक्षेच्या अन्नानें तीन देवतेकरितां चार चार मुठी घ्याव्यात आणि त्यांवर प्रोक्षण करावें. त्यांचें शिजविणें इत्यादि आघारहोमापर्यंत करून, अवदानाच्या धर्मानें चरू घेऊन.
“ सदसस्पति० ” (२७) ह्या मंत्रानें एक आहुति द्यावी. हें हवि सदसत्पतीचें आहे; माझें नाहीं असें बोलावें. नंतर “ तत्सवितु० ” हा मंत्र बोलून एक आहुति द्यावी. हें हवि सूर्याचे आहे माझें नाहीं. असें बोलावें. ऋषींना एक आहुति देऊन हें हवी ऋषीचें आहे माझें नाहीं. अशा रीतीनें चरूच्या तीन आहुति होमून स्थालीपाक पृष्ठ ४९ प्यारा २८ येथून पृष्ठ ५३ प्यारा ३३ पर्यंत स्विष्टकृत् इत्यादि होम पुरा करून, हवि:शेष ब्राह्मणांस द्यावा. अशा रीतीनें अनुप्रवचनीयहोम संपला.
ब्रह्मचार्यानें क्षार, लवण इत्यादिकानें वर्ज्य असें भोजन करावें, खाली निद्रा करावी
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP