मराठी मुख्य सूची|विधी|संस्कार|सोळा संस्कार|सार्थ षोडशसंस्काररत्नमाला|
मंडपदेवताप्रतिष्ठा

मंडपदेवताप्रतिष्ठा

‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.


ती अशी कीं, दूर्वा, शमीचीं पानें, कुलदेवता वृक्षपल्लव ह्यांना आंब्याच्या वगैरे मोठ्या झाडांच्या उभ्या पानांनीं वेष्ठित करून, त्याला सुताच्या सहा वेढ्यांनीं गुंडाळावें याप्रमाणें सहा कराव्या. त्यामध्यें एकांत मुसळदर्शक एक बारीक काष्ठ, एकांत सुरी इत्यादि शस्त्र मध्यभागीं ठेवून मग वेष्ठन करावें. ती सर्व सहा, वेळूच्या एका पात्रांत ठेवून त्याच्या मध्यभागी उत्तरादिक्रमानें चार बाजूंस क्रमानें नंदिनी, नलिनी, मैत्रा, उमा, पशुवर्धिनी आणि भगवती ह्यांचें आवाहन करावें. मातीच्या कलशांत तांदूळ भरून त्यांत हळकुंडें व सुपारी ठेवून त्यावर मातीचा शराव पालथा झांकून त्या कलशासह शरावास सुतानें वेष्ठन करून हळदीनें रंगविलेल्या अशा कलशावर अविघ्न नांवाच्या गणपतीचें आवाहन करावें. ते याप्रमाणें.
नंदिन्यादिकांची तदस्तु० गृहावि० ह्या मंत्रानें स्थापना करून ध्यान आसन पाद्य अर्घ्य आचमनपर्यंत करून तेल लावणें इत्यादि अभ्यंगस्नान उष्ण पाण्यानें सहांनाही करवावे. नंतर वस्त्र गंध अक्षता हळदकुंकु पुष्प धूप दीप नैवेद्य तांबूल दक्षिणा पर्यंतच्या सर्व उपचारांनीं पूजन करून निराजन करावें.
नंतर मातृकास्थापित वंशपात्रांमध्यें नंदिनीला स्थापन करून " स्मुद्रज्येष्टा० " " आपोहिष्टा० " (१) ह्या दोन मंत्रांनी प्रोक्षण करून " गंधद्वारा० " ह्या मंत्रानें गंध आणि घालाव्यात. " दधिक्राव्णो० " (२) ह्या मंत्रानें दही अर्पण करावें " कांडात्कांडा० " ग्यानें दूर्वा आणि फ़ुलें अर्पण करावींत. नंतर त्याच क्रमानें नलिनी, मैत्रा, उमा, पशुवर्धिनी ह्या वेष्टित केलेल्यांना स्थापन करून सर्व पूजन करावें. " याआपोदिव्या० " ह्या मंत्रानें नलिनीवर प्रोक्षण करावें. " यासांराजा० " या मंत्रानें मैत्रेला, " यासुराजा० " ह्या मंत्रानें उमेला, " समुद्रज्येष्ठा० " ह्या चारही मंत्रांनी पशुवर्धिनीला प्रोक्षण करावें. बाकीचें सर्व मंत्र वरील प्रमानें सारखेंच आहेत. नंतर शस्त्रगर्भाभगवती व अविघ्नसंज्ञगणपती याचेवर प्रोक्षण, गंधाक्षत, दही दूर्वा फ़ुले अर्पण करावीत.
कोणी मंडप निर्माण पूर्वक देवा स्थापन करतात, ते याप्रमाणे - पत्नीसह आपण उठून आग्नेय कोणामध्यें असलेल्या खांबागर नंदिनींला " तदस्तु० गृहावै० ॥ " ह्या मंत्राने स्थापन करावे. नंतर नैऋत्य, वायव्य ईशान्य ह्यांच्या खांबावर व मंडपाचे मध्यभागी वरील काष्टावर क्रमाने नलिनी मैत्री, उमा पशुवर्धिनी ह्या वेष्टित केलेल्यांना सर्व स्थापना करून वर सांगितल्याप्रमाणें प्रोक्षण, गंधाक्षत, दहि, व दूर्वांफ़ुले यांनीं पूजा करावी.
नंतर वंशपात्रासह भगवतीला आणि गौरी इत्यादि मातृका स्थापन केलेलें वंशपात्र स्वत: घ्यावें. आणि अविघ्नकलश पत्नीकडून घेववून ब्राह्मणा बरोबर " कनिक्रद० " (१) ’ प्रदक्षिणि ’ (२) हें सूक्त पठण करीत करीत मंगलवाद्यांच्या गजरासह घराचे आंत जाऊन, ईशानदिशेस तांदूळ इत्यादिकांच्या केलेल्या तीन पुंजावर ती तीनही " तद्स्तु० गृहावैप्रतिष्ठा० " ह्या मंत्राने स्थापन करून. " आवाहित० " या मंत्राने गंध, अक्षता, पुष्प, धूप, दीप नैवेद्य इत्यादिकांनीं पूजा करावी. स्थापन केलेल्या देवतांच्या प्रीतीकरिता ब्राह्मण आणि सुवासिनी ह्यांना भोजन देण्याचा संकल्प करून, भूयसीदक्षिणा द्यावी.
नंतर नीराजन केलेल्या दंपतीला मित्र, आप्त इत्यादिकांनीं येऊन " युंववस्त्रा० " इत्यादि मंत्रांनीं वस्त्रें द्यावीत. नंतर अतिक्रांत जातकर्मादिकांच्या संस्काराचें अनुष्ठान करावे. अशी मंडपदेवतांची प्रतिष्ठा झाली.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP