कुंडमंडप वेदीलक्षण
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
ग्रग्रहयज्ञाकरितां किंवा इतर लौकिकाग्निसाध्य अशा सर्व कर्माकरिता कुंडा करणें असेल तर एकपासून ४९ आहुतिपर्यंत कुंड न करितां १८ अंगुल औरस चौरस प्रमाणाचें स्थंडिल करावें. पुढे ५० पासून ९९ आहुतीपर्यंत मुष्टि ( मुंढ्या ) हाताचे ( रत्निमानाचे म्हणजे २१ अंगुल ) औरस चौरस प्रमाणाचें कुंडा करावे. शंभरपासून ९९९ आहुतिपर्यंत अतत्निमानाचे २२॥ अंगुंल प्रमाणाचे ) औरस चौरस कुंड करावे. १००० आहुति पासून ९९९९ आहुतिपर्यंत हस्तमानाचे (२४ अंगुल ) औरस चौरस प्रमाणाचे कुंड करावे. एक हात (२४ अं. ) प्रमाणाचे कुंडास १५ अंगुले खात करून त्या खातास औरस चौरस १ अंगुल कंठ सोडून वर ९ अंगुल प्रमाण पर्यंत ३ मेखला कराव्या. १ ली वरील मेखला ४ अंगुल कंठ सोडूब्न वर ९ अंगुल प्रमाण पर्यंत ३ मेखला कराव्या. १ ली मेखला ४ अंगुले उंच ४ अंगुले रुंद. २री मधली ३।३ अंगुले व ३ री खालची मेखला २।२ अंगुले प्र. औरस चौरस असावी. एकच मेखला करणे असेल तर ६ अंगुल रुंद अशी औरस चौरस असावी. योनि काणे ती पश्चिमेकडेल मेखलेवर २४ अंगुल प्रमाण कुंडास १२ अंगुल प्रमाण कुंडास लांब ८ अंगुले रुंद अशी असून कुडाच्या खालच्या मेखलेच्या भूमीपासून वरच्या मेखलेवर १ अंगुल पर्यंत पिंपळाच्या पानाच्या आकृतीची ( पानाच्यामधून देठाकडून तूप सोडले असता शेंड्याकडून ते तूप त्वरीत कुंडात जावे ) अशी कुंडाकडे उतरती. असावी पानाच्या देठाच्या दोन्ही बाजूवर अर्धकुंभाकृति ( अंडाकृति ) दोन गोळे ठेवावे. नाभि करणे ती४।४ अंगुले औंरस चौरस प्रमाण कुंडाच्या आकाराची करून कुंडांत मध्यभागी ठेवावी. मधल्या मेखलेवर परिधि परिस्तरणाकरिता अंतर ठेवावे. ज्या मानानें कुंड मोठे करणे असेल त्या मानाने खनन करावे. पश्चिम्ज मेखलेवर कुंडाच्या विस्ताराच्या द्वितीयांशाने लांब व तृतीयांशाने रुंद अशी योनि जमिनीपासून रचावी. उदाहरण :- २१ अंगुलास १०॥ अं. लांब व ७ अं. रुंद या मानानें जसें कुंड लहान मोठे करणे असेल तशी करावी. चतुरस्त्र कुंड सर्व सिद्धि देणारे आहे. कुंड प्रमाणापेक्षा कमी किंवा अधिक करूं नये. तसे झाल्यास सौख्य प्राप्त होत नाहीं.
औपासनकुंड लक्षण -- औपासन अथवा गृह्योक्त साध्य कर्माकरितां कुंड करणे. ते २४ अंगुले औरस चौरस असावे. यास कंठ, खात, योनीची जरूरी नाहीं. ह्या कुंडाच्या बाहेर मेखला दोन अंगुले रुंद व आंतील मेखला ४ अंगुले रुंद. त्याचप्रमाणे बाह्य मेखला ६ अंगुले उंच व आंतेल मेखला १२ अंगुले उंच असावी. या ठिकाणीं अरत्नि म्हणजे २४ अंगुले आणि९ प्रादेश ह्म. १२ अंगुले सांगितले आहे. वरील कुंडाच्या प्रमाणांत अरत्नि म्हणजे कोपरापासून कनिष्टिकेच्या अग्रापर्यंतच्या हातास किंवा २२॥ अंगुलास अरत्नि म्हटले आहे. प्रयोगरत्नांत औपासन कुंडा २४ अंगुले किंवा २२॥ अंगुले अथवा १६ अंगुले औरस चौरस प्रमाणाचे ४।४ अंगुलांच्या ३ मेखलांनी युक्त करण्यस सांगितले आहे.
वैश्वदेवकुंडलक्षण -- वैश्वदेवाकरितां कुंड करणे ते मेखला सहा अंगुले उंच खात ४ अंगुले व लांबे - रुंदी १२।१२ अंगुले असावी.
मंडपलक्षण -- ग्रहयज्ञाकरितं मंडप करणे असेल तर घराच्या उत्तरेस किंवा पूर्वेस अथवा शंकराच्या देवालयाजवळ १० किंवा ८ हात दक्षिणेकडून उत्तरेकडे असा औरस चौरस चार द्वारांनीं युक्त असावा.
ग्रहवेदी लक्षण -- ग्रहवेदी एक वीत उंच असून तिला तीन मेखला असाव्या. १ली मेखला २ अंगुले. २ री व ३ री १ - १ - अंगुलाची असावी.
स्थंडिल -- कुंडरूप अग्निस्थान होणें शक्य नसल्यास स्थंडिलावरही होम करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP