सुखाने प्रसूत होण्याचा उपाय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
पारस्कर गृहसूत्रांत सांगितले आहे, जेव्हां गर्भिणीचा प्रसूत होण्याचा काल येईल अथवा प्रसूतिवेदनास आरंभ होईल त्यावेळीं आणि प्रसव होण्यास प्रतिबंध झाला असल्यास ऋग्विधानांत सांगितले आहे कीं, स्नान करून शुचिर्मूतपणाने पवित्र ठिकाणी बसून ताम्हनांत पाणी घेऊन त्यांत दर्भ ठेवून ‘ विजि हीष्वेर्तिवनस्पते० ” या सूक्ताचा जप करावा अथवा दर्भानें पाणीं तें गर्भिणीच्या शरीरावर मार्जन ( सिंचन ) करावे. किंवा त्या पाण्यांत दर्भ ठेऊन या सूक्तानें ते पाणीं ११ वेळ मंत्रून गर्भिणी स्त्रियेस प्राशन करण्यास द्यावे तेणेकरून सुखानें प्रसूत होते.
दुसरा उपाय “ हिमवत्युत्तरे० स्वाहा ” हा म्हणून दूर्वांकुरानें तिळाचे त एल शंभरवेळा अथवा हजारवेळा अभिमंत्रित करून ते तेल किंचित् गर्भिणीस पाजावे आणि किंचित् गर्भस्थानीं लेपहि करावा चांगल्या रीतीने लेप केला असतां सुखानें शीघ्र प्रसूत होते.
तिसरा उपाय -- वेळूची साल, निंबवृक्षाची साल, तुळशीची मुळी, कवठीच्या झाडाचे पान, कण्हेरीचे बी हे सर्व सारख्या वजनानी घेऊन म्हशीच्या दुधांत वाटावे आणि त्यांत तिळाचे तेल घालून सर्व एकत्र मिश्रण करून तो लेप योनीस लाविला असतां प्रसूत होते.
प्रसूत होण्याचे गृह -- नैऋत्यदिशेस असावे आणि त्याम्त दहा दिवसापर्यंत विशेषेकरून शस्त्रें ( विस्तव ) टेंबुरणीची पेटती लाकडे, पाण्यानें भरलेलें कुंभ, दिवा, मुसळ व पाणी असावे.त्यांत चित्रविचित्र रांगोळी काढावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP