सीमांत पूजनाचा प्रकार
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
वाग्दान झाल्यावर विवाहाला योजिलेल्या सुमुहूर्ताच्या पूर्वी कन्यापिताच्या घरीं जाऊन पोंचतां येईल अशा सुमाराने वरपित्यानें आपली सर्व तयारी करून वरास घेऊन निघावें. इकडे कन्यापित्यानेंही वराचा जो येण्याचा मार्ग असेल त्या मार्गानें येणार्या वराची आपल्या गांवाच्या सीमेवर गांठ पडेल अशा बेतानें कांहीं मंडळीसह निघून गांवाच्या सीमेवर जाऊन रहावें. त्या ठिकाणी वर आला म्हणजे सर्वांचा आदर करून त्यांस त्याठिकाणी बसवावे व मी कन्येच्या विवाहाचे अंगभूत असें या ठिकाणी गांवाच्या सीमेवर वराचे पूजन करतो, असा संकल्प करून गणपति व वरुण यांची पूजा करावी. नंतर वरपक्षीयास वस्त्रें व सुगंधिद्रव्यें द्यावी आनि वराचे पाय धुवून त्यासही वस्त्रभूषणें द्यावी कर्माच्या फ़ल प्राप्तीसाठीं ब्राह्मणास दक्षिणा द्यावीं व विष्णूस नमस्कार करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP