मृतभार्यात्व दोष जाण्यास उपाय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
परिवेत्तृत्व पापानें मृतभार्यात्वदोष प्राप्त होतो, यास्तव त्या दोषाचा परिहार होण्याकरितां तीन प्राजापत्यें व तीन चांद्रायणें करावी. वारंवार मृतभार्यात्व योग असेल तर तीन प्राजापत्यें व तीन चांद्रायणें आवृत्तीनें करून, ‘ मृतभार्यात्व० करिष्ये ” असा संकल्प करून अग्निस्थापनापर्यंत कर्म केल्यानंतर अन्वाधान करावें तें असें - “ दुर्गाग्नि० शेषेणस्विष्टकृतमित्यादि ” असें अन्वाधान करून, प्रत्येक देवतेस मंत्रविरहित चार वेळ निर्वाप करून म्हणजे चरु शिजविण्याकरितां स्थालीत चार वेळ तांदूळ घेऊन ते धुवावे. नंतर त्यागकालीं “ अष्टोत्तर० नमम ” असा त्याग करावा. नंतर होम करावा तो असा जातवेदसे० विनियोग: ’ पुन: पुन: तोच तोच अनुवाक म्हणून तेर्णेकरून प्रत्येक ऋचेनें होम करावा. त्यांमध्यें प्रथम ५,००४ चरुहोम करून नंतर ५००४ आज्यहोम करावा. याप्रमाणें दहा सहस्त्र होम करावा. नंतर होम शेष समाप्त करून ब्राह्मणाला भोजन घालावें अथवा कोणा एका ब्राह्मणाचा विवाह करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP