कन्येचा वैधव्ययोगपरिहार करणारे विधान
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
कन्येचा विवाह करणारा पित्रादिक यानें, “ कन्या० ” असा संकल्प करून नां दीश्राद्धापर्यंत कर्म करून “ महीद्यौ:० ” इत्यादिक विधीनें कुंभ स्थापन केल्यानंतर त्या कुंभावर वरुनाच्या प्रतिमेचे ठिकानी वरुणाची पूजा करून, त्या कलशाच्या मध्यभागीं विष्णूची प्रतिमा स्थापून त्या प्रतिमेवर विष्णूची षोडाशोपचारांनीं पूजा करून प्रार्थना करावी. प्रार्थनेचा मंत्र “ वरुनांग० दु:खत: ” या मंत्रानें प्रार्थना केल्यानंतर “ विष्णुरूपिणे० समर्पयामि ” असें वाक्य म्हणून कन्या कुंभाला देऊन “ परित्वा० ” इत्यादिक मंत्रांनीं खालीं व वर कुंभ आणि कन्या यांना मंत्राच्या आवृत्तीनें सूत्राचे वेष्टन करावें तदनंतर कुंभ एकीकडे करून तो जलाशयांत टाकावा. नंतर शुद्धोदकानें “ समुद्रज्येष्ठा० ” इत्यादिक मंत्रांनीं पंचपल्लवांनी कन्येवर अभिषेक करून ब्राह्मणांना भोजन घालावें. असा कुंभविवाह सांगितला.
मूर्तिदानही येथेच सांगतो - उत्तम ब्राह्मणाला बोलावून त्याची अनेक उपचारांनीं पूजा करून त्याला, सांगितलेल्या विधिनें विष्णूची चतुर्भुज मूर्ति द्यावी.
विष्णुमूर्तिदानविधि - कन्येनें देशकालाचा उच्चार करून “ वैधव्यहरं० ” असा संकल्प करून, एक पळ (४० मासे ) किंवा अर्ध पळ, पाव पळ यांतून कोणत्या तरी एका मानानेम सुवर्णाची केलेली सायुध चतुर्भुज अशी विष्णुमूर्ति, तिची अग्न्युत्तारनपूर्वक षोडशोपचार पूजा, पूर्वी वरलेल्या आचार्याकडून करवावी. पूजेमध्यें ज्यावेळीं वस्त्र अर्पण करावयाचे त्यावेळीं दोन पिंवळीं वस्त्रें व पुष्पें अर्पण करावयाचीं त्यावेळीं कुमुदें व कमळें यांची माळाही अर्पण करावी. याप्रमाणें पूजा झाल्यानंतर कन्येनें मूर्तिला नमस्कार करून मंत्र म्हणून त्या मूर्तिचे दान करावें. दानाचा मंत्र “ यन्मया० द्विज ” याप्रमाणें मंत्र म्हणून दान करावें. नंतर यथाशक्ति सुवर्ण दक्षिणा “ मी आज पापरहित झालें ” असें कन्येनें तीन वेळा म्हणावें. “ असेंच होवो ” ब्राह्मणानेंही तीन वेळा म्हणावे. नंतर ब्राह्मणभोजन घालावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP