मातृकापूजन
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
गौरी १ पद्मा २ शची ३ मेधा ४ सावित्री ५ विजया ६ जया ७ देवसेना ८ स्वधा ९ स्वाहा १० माता ११ लोकमाता १२ धृति १३ पुष्टि १४ तुष्टि १५ ( आपली ) कुलदेवता १६ ब्राह्मी १७ माहेस्वरी १८ कौमारी १९ वैष्णवी २० वाराही २१ इंद्राणी २२ चामुंडा २३ ( गौरी आदि १६ ब्राह्मी आदि ७ = २३ ) गणपती २४ दुर्गा २५ क्षेत्रपाल २६ वास्तोष्पति २७ यांचे अक्षता ( तांदूळ ) चे राशीवर आवाहन करितों असे म्हणून तदस्तु (१) व गृहावै (२) हे मंत्र म्हणून स्थापना करावी. व गौर्याद्या० या नाममंत्रानें १६ उपचारांनीं पूजा करावी. गौरीर्मिमाय. (३) मंत्रानें मंत्रपुष्प अर्पण करून या पूजेनें गौर्यादि आवाहितदेवता संतुष्ट होवोत अशी प्रार्थना करावी.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP