सर्वप्रायश्चित्त प्रयोग
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
वस्त्रासहवर्ततान स्नान करून; शक्त असेल तर लोलें वस्त्र धारण केलेला असा ब्राह्मणांच्या सभेपुढें एक गाय व बैल यंचा प्रतिनिधि असा निष्क इत्यादि परिमित ब्रह्मदंड ठेवून साष्टांग नमस्कार करून सभेला प्रदक्षिणा करून “ सर्वेधर्म - द्विजसत्तमा: ” या श्लोकांनीं ब्राह्मणांची प्रार्थना केल्यावर तुम्हीं मजवर अनुग्रह करा असें बोलावें. कोणतें तुझें कार्य आहे ? असें विचारलें असतां त्यानें सांगावें कीं, मी किंवा माझ्या पत्नीनें ह्या अथवा अन्यजन्मीं वांझपणा, मृतवांझपणा, यला कारणभूत असें बालहत्त्या, रत्नांचा अपहार इत्यादिक पातक केलें त्याचा नाश व्हावा याकरितां कर्मविपाकांत सांगितलेला जों हरिवंशग्रथाचें श्रवण इत्यादिक विधि त्याचा अधिकार प्राप्त होऊन दीर्घायु अशी पुत्र इत्यादिक संतति प्राप्त होण्याकरितां प्रायश्चित्त तुम्हीं मला सांगावें. अशी प्रार्थना केल्यानंतर त्या ब्राह्मणांनी जो अनुवादक त्याला सहा अब्द, तीन अब्द दीड अब्द यांतून कोणतेहि प्रायश्चित्त पूर्वोत्तरांगसहित असें घेतल्यानें तुझी शुद्धि होऊन तूं कृतकार्य होशील असे बोलावे. अनुवादकानेम पापी याच्याजवळ सांगावें. तदनंतर प्रायश्चित्तकर्त्यानें “ ॐ ” ( बर आहे ) असें म्हणून अनुवादकानें सांगितलें त्याचा अंगीकार करावा, व सभेचें विसर्जन करावें. नंतर देशकालाचा उच्चार करून संकल्प करावा. “ सभार्यस्य० माचरिष्ये ” असा संकल्प करून दोनप्रहरीं क्षौर करून स्नान करावें. नंतर वनस्पतीची “ आयुर्बलं० वनस्पते ” या मंत्रानें प्रार्थना करून आघाड्याच्या काष्ठानें दंतधावन करावें. तदनंतर दहा स्नानें करावींत. त्यामध्यें मस्तकाला भस्म स्नान करावें तें असें - भस्म हातीं घेऊन “ ईशा० ” या मंत्रानें मस्तकाला भस्म लावावें. “ तत्पुरु० ” या मंत्रानें मुखाला, “ अघोरा० ” यानें हृदयाला, “ वामदे० ” यानें गुह्यस्थानीं, “ सद्योजा० ” यानें पायाला, प्रणवमंत्रानें सर्व अंगाला भस्म लावावें. स्नान करून आचमन करावें. नंतर गोमय घेऊन प्रनवमंत्रानें गोमयाचा दक्षिणभाग चार दिशांचे ठिकाणी टाकावा व उत्तरभाग तीर्थांत टाकून बाकी राहिलेलें गोमय “ मानस्तोके० ’’ ( पृ. ५२ ओ. १६ ) या मंत्रानें अभिमंत्रण करून “ गंधद्वारां० ” ( पृ. ९ ओ. ३ ) या मंत्रानें गोमय सर्व शरीराला लावावें. नंतर “ हिरन्यशृंगं० ” ह्या दोन मंत्रांनीं तीर्थाची प्रार्थना करून “ याप्रवत० ” ( पृ. १०२ ओ. १ ) ह्या मंत्रानें तीर्थाला स्पर्श करून स्नान करून दोन वेळां आचमन करावें. “ अश्वक्रांते० ” ह्या मंत्रानें मृत्तिकेचें अभिमंत्रण करून “ उदूधृतासि० ” या मंत्रानें मृत्तिका घेऊन “ नमोमित्रस्य० ” या मंत्रानें सूर्याला दाखवावी. नंतर “ गंधद्वारा० ” ( पृ. ९ ओ. ३ ) ह्यानें मस्तकादि सर्व अंगाला मृत्तिका लावून स्नान करून दोन वेळां आचमन करावें. नंतर “ आपोअस्मान्० ” ( पृ. ५१ ओ. ९ ) हा मंत्र म्हणून सूर्याच्या समोर उभा राहून “ इदंविष्णु० ” ( पृ. ६७ ओ. १ ) या मंत्राचा जप करून उदकाच्या प्रवाहाभिमुख बुडी मारावी. तदनंतर पंचगव्य व कुशोदक यांची निरनिराळी स्नानें करून स्नानसंबंधी तर्पण इत्यादिक करावें. नंतर विष्णुश्राद्ध व पूर्वांगसंबंधी गोप्रदान करून अग्नीची स्थापना करून पंचगव्याचा होम, व्याहृतिमंत्रांनीं १०८ अथवा २८ असा घृताचा होम करून ( व्रत - नियम घेतों ) अशी ब्राह्मणांची प्रार्थना करून उरलेले पंचगव्य ( पृ. ५८ ) प्रणवमंत्रानें प्राशन करावें. असा सर्वप्रायश्चित्त प्रयोग संपला.
इति सार्थ षोडशसंस्काररत्नमाला समाप्त.
॥ ॐ तत्सत् ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP