सांगवेदाध्यानाचा प्रकार सांगतो
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
उपाकर्म ( श्रावणी ) करून पूर्वी सांगितलेला जो विद्येच्या आरंभाचा काल त्या कालीं अक्षरविद्येच्या आरंभी जशीं विष्णु इत्यादिक देवतांची पूजा करण्यास सांगितली त्या प्रकारानें पूजा करून वेदाध्ययनाचा आरंभ करावा. * वेदाच्या अध्ययनाचे आरंभी आणि समाप्ति कालीं गुरूचें पादोपसंग्रहण ( गुरूचें चरण धरणें ) करावे. प्रथम ओंकाराचा उच्चार करून नंतर वेदाचे अध्ययन करून शेवटीं ओंकाराचा उच्चार करून भूमीला स्पर्श करून विराम करावा. रात्रीच्या पहिल्या प्रहरीं व शेवटच्या प्रहरीं वेदाध्ययन करावें. “ दोन प्रहरपर्यंत निद्रा करणारा ब्रह्मत्वाला पावतो ” गुरु, पिता, माता यांचा सन्मान ठेवावा, कधींहि द्रोह करूं नये. “ गुरुपाशीं अध्ययन केलेलें असें शिष्य वाणी, मन, कर्म यांनीं जर गुरूच्या सत्कार न करतील तर जसे ते गुरूला पालन करण्यास योग्य नाहींत तसे वेदही त्यांचें पालन करीत नाहींत; म्हणजे त्यांना ते वेद फ़लद्रूप होत नाहींत.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP