वरानें वधूच्या घरी प्रवेश करण्याचे विधि
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
विवाहाचे दिवशीं वरानें आपल्या स्नानसंध्यादि नित्यक्रिया केल्यावर यथाविधीप्रमाणें स्वस्तिवाचन करून ब्राह्मणांबरोबर चांगल्या मिष्टान्नाचा सात्विक आहार करावा अथवा न करावा. नंतर नवीं एकदां धुतलेलीं. पांढरी दशा ( आंवळ्या ) असलेली, दुसर्यानें न वापरलेली अशीं दोन वस्त्रें धारण करून म्हणजे एक नेसून आणि एक पांघरून, अलंकार ( मुंडावळी ) धारण करून, इष्टदेवतेला आणि वडिलांना वंदन करून, त्यांची आज्ञा घेऊन, आपल्या ऐश्वर्यानुरूप घोडा पालखी इत्यादिकांचें वाहनावर बसून, शुभ्र छत्री घेऊन, उत्तम पोषाख केलेल्या बंधुवर्गांसहित ब्राह्मणांनीं “ कनिक्रदत्० ” हें सूक्त म्हणत वराच्या बरोबर जावें. आणि बरोबर सुवासिनी तसेंच उदकपूर्णकलश, आरसा, कुमारिकां, पुष्पें, अक्षता, दीपमाला, ध्वज, लाह्या ( भाताच्या ), मंगलकारक गायक व वाद्यांचा गजर ह्यांसह मोठ्या समारंभानें वधूच्या घराजवळ त्यांच्या दरवाज्याशीं पूर्वेस तोंड करून उभें राहावें. नंतर त्याच्या सामोरे कन्यापक्षीय सुवासिनींनीं आरती, उदकपूर्णकुंभ ह्यांनींयुक्त अशा सुवासिनींनीं जावें आणि त्याला नीरांजन करून आपल्या घरामध्यें आणून प्रवेश करवावा. त्या अंगणांत मंडपाचे खाली छत वगैरे दिलेलें असेल त्या ठिकाणी हिरवे दर्भ पसरलेल्या स्थानीं उत्तम भद्रासन काढलेल्या उत्तम आसनावर पूर्वेस तोंड करून बसवावें.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP