गर्भरक्षणाचा प्रयोग
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
गर्भधारण झाल्यावर २ र्या ३ र्या महिन्यांत पुंसवनांस सांगितलेल्या शुभ दिवशीं लक्ष्मणा ( पांढरी रिंगणी ) वटशुंगा ( वडाच्या कोमल डिर्या ) सहदेवी ) महाबला हिची फ़ुलें पिवळीं असतात ) विश्वदेवा ( लघुचिकणा ) ह्या औषधी गाईच्या दुधांत उगळून पतीनें पुत्रेच्छा असलेल्या पत्नीच्या उजवे नाकांत ३।४ थेंब घालावे व ते खालीं पडू देऊं नयेत.
२ रा प्रयोग :-- वडाची कोमल पानें १ मासा अथवा वडाच्या पारंबी १ मासा आणि गुळवेल ह्या दोहोंचे वस्त्रगाळ बारीक चूर्ण ( नाकांत जाईल ) असें करून ते हुंकण्यास द्यावे किंवा पाण्यांत घोळून ३।४ थेंब नाकांत सोडावे.
३ रा प्रयोग :-- ज्या वडाच्या झाडाखालीं गाई चरतात त्या वडाच्या पूर्वेकडील उत्तर बाजूच्या फ़ांदीत असलेला दोन कोमल कळ्या तोडून घ्याव्या व दोन स्वच्छ मोठे तांदूळ तसेंच दोन उडीद आणि दोन पांढर्या मोहर्यांचे दाणे मिसळून दह्याबरोबर पुष्य नक्षत्र असेल त्या दिवशी खाण्यात द्यावे.
४ था प्रयोग :-- पुष्य नक्षत्रावर काढून आणलेल्या पांढर्या रिंगणीची मुळी दुधांत उगाळून ते थेंब पुत्राची इच्छा असल्यास उजवें नाकांत व कन्येची इच्छा असल्यास डावे नाकांत घालावें.
वड हा रक्तपित्त, उष्णता, दाह, मेद वगैरेंचा नाशक व्रण घालविणारा, तुटलेले जोडणारा तसाच गर्भास पुष्टि देणारा असा आहे आणि गुलवेल हा ज्वर, पित्त, कफ़, खाज, अरुचि, वमन, तृषा, दाह हगवण इत्यादि नाहींसें करणारा असून गर्भिणीचे सर्व दोष दूर करणारा आहे.
गुळवेल विषनाशक व ब्राह्मी वीर्यवर्धक व थंड आहे. तेव्हां गुळवेल व ब्राह्मी नियमपूर्वक सुंठ व दूध या बरोबर सेवन केले असतां गर्भाला पुष्कळ फ़ायदा होईल.
५ वा प्रयोग :-- दोन मासे अश्वगंधा ( आस्कंध ) घेऊन साधारण बारीक कुटून ४० तोळे पाण्यामध्यें घालून एक अष्टमांश म्हणजे ५ तोळे काढा उरवणे नंतर त्यात १ तोळा खडीसाखर घालून सकाळी निम्मा व रात्री निजण्यापूर्वी निम्म सेवन करणें. या प्रमाणें १ ल्या महिन्यापासून ९ महिने पर्यंत सेवन करणे यापासून गर्भपात अजिबात टळून गर्भिणी सशक्त होते आणि प्रसूतिही सुलभ होऊन होणारे बालक अत्यंत निरोगी पुष्ट, बलिष्ठ होऊन दीर्घायुषी होईल. [ श्रीस्वामी शिवनंदनतीर्थ कथित. ]
वरील प्रयोग करतेवेळी पतिपत्नीनें आपली शुभेच्छा पूर्ण व्हावी व गर्भाचे रक्षण व्हावे अशी परमेश्वराची प्रार्थना केली असतां गर्भपात न होता गर्भ स्थिर राहील.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP