कन्यावैधव्ययोगनाशक उपायांचा निर्णय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
मार्कंडेयपुराणाचे वचन - कन्येला बालवैधव्ययोग असेल तर उदकानें भरलेला कुंभ, अश्वत्थादि वृक्ष, सुवर्णाची विष्णु प्रतिमा इत्यादिकांसह तिचा विवाह करून नंतर त्या कन्येचा वराशीं विवाह करावा असें कित्येक विद्वान् सांगतात. असा विवाह केला असतां पुनर्विवाहाचा दोष उत्पन्न होत नाहीं. विधानखंडाचें वचन - सुवर्ण, उदक आणि पिंपळ यांची जी प्रतिमा पुनर्भू ( द्विवार विवाहित ) होत नाहीं. सूर्यारुणसंवादांत सांगितलें आहे की, घरांत एकांतस्थळी कन्येच्या अंगास व कुंभास हळदकुंकू लावून विवाहाच्यापूर्वी चंद्रबळ व ताराबळ पाहून विवाहोक्त मुहूर्तावर त्या कन्येचा कुंब्याबरोबर विवाह करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP